सुविधा

संगणक कक्ष

सर्वसमावेशक शिक्षण

सुसज्ज ग्रंथालय

अद्ययावत प्रयोगशाळा

विद्यालयामधील उपक्रम व सोयीसुविधा

विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व व शैक्षणिक विकासासाठी राबविले जाणारे विविध उपक्रम

ई-लर्निंग

विध्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांचा वैचारिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यशाळा व तज्ज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित केले जाते

स्वतंत्र प्रसाधनगृह

मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आली आहे.

व्यवसाय शिक्षण

विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयापासूनच त्यांची व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यासाठी व्यवसाय शिक्षण दिले जाते.

वैद्यकीय तपासणी

सर्व मुलामुलींची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते व किशोरवयीन मुलामुलींचे समुपदेशन केले जाते.

अभ्यासिका वर्ग

विध्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विध्यार्थ्यांसाठी अतिरिक्त अभ्यास वर्ग चालविले जातात.

या संख्यांचा आम्हाला अभिमान आहे

शिक्षकांच्या प्रयत्नाने व विध्यार्थ्यांच्या मेहनतीने संगमेश्वर विद्यालयाचे नाव नेहमीच आदराने घेतले

1125 एकूण विध्यार्थी संख्या
37 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
10 विविध पारितोषिके
3 विद्यालयातील शाखा

विद्यालयाविषयी माहिती

स्थापना

श्री पारमार्थिक सेवा संघ (मुंबई) व पारगाव येथील शिक्षणप्रेमी आणि समाजसेवक यांच्या प्रयत्नाने सन १९७६ मध्ये प्रथम इ. ८ वी च्या एका वर्गाने व एकूण ३२ विध्यार्थ्यांच्या प्रवेशाने विद्यालयाची पायाभरणी झाली.

विद्यालयामधील वर्ग

विद्यालयामध्ये सध्या इ. ५ ते १२ वी पर्यंतचे वर्ग चालविले जातात. त्यामध्ये मराठी व सेमी-इंग्लिश अशा दोन्ही माध्यमातील शिक्षण वर्ग सुरु आहेत. जुनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान अशा तीनही शाखांमधील शिक्षण दिले जाते.

अभ्यासेतर उपक्रम

विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यालयातून सतत जाणीवपूर्वक विशेष उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास शिबीर, कल-चाचणी, क्रीडा स्पर्धा, विविध शिष्यवृत्या,व्यवस्थापन व व्यावसाय शिक्षण इत्यादींचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण

विध्यार्थ्यांच्या तणावमुक्त शिक्षणासाठी सर्व शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळेच विद्यालयाचा १० वी व १२ वी च्या बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला जातो. ज्ञान हे फक्त संख्यात्मक दृष्टीने न मोजता ते प्रत्यक्ष व्यवहारातून कसे वापरता येईल यासाठी प्रयत्न केले जातात.

गुणवत्ता व कौशल्य

विद्यालयाची कार्यप्रणाली हि सर्वांगीण, सातत्यपूर्ण, स्वास्थपूर्ण, सर्वाधित व संपूर्ण शिक्षण या पंचसूत्रीवर आधारलेली असून ती बदलत्या शिक्षण व्यवस्थेस पोषक आहे.

90%

विद्यार्थ्यांची उपस्थिती

96%

परीक्षांचा निकाल

91%

बौद्धिक विकास

94%

विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग

संस्थेची उद्दिष्ट्ये

"मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळवून भागणार नाही. तिचा उपयोग करण्याची कौशल्ये आणि मार्ग त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे ही खरी आवश्यकता आहे. प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल यासाठी विद्यालय नेहमी प्रयत्नशील असते. संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सर्व शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास मूल्यमापन प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती/दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये आणि क्षमता, शारीरिक कृती या सर्व आयामांसह होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक, प्रशासक, विद्यार्थी या सर्व घटकांत जागृती आणि जिज्ञासा करणे हेच एकमेव संस्थेचे उद्दिष्ट आहे."

पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.

महात्मा गांधी

पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.

रवींद्रनाथ टागोर

देशाची सामाजिक प्रगती हि त्या देशात महिलांना मिळणाऱ्या वागणुकीवरून ठरवली जाते

कार्ल मार्क्स

संपर्क

पुढीलप्रकारे आपण विद्यालयाशी संपर्क साधू शकता

पत्ता

पारगाव(शिंगवे), तालुका-आंबेगाव जिल्हा-पुणे

इमेल

svpargaon@gmail.com

संपर्क क्र.

(०२१३३) २८४३७२

संदेश पाठवा

विद्यालयाशी आपल्या सूचना व मदत पाठविण्यासाठी संदेश पाठवा